call : 7272971971
  • Home
  • About Us
    • Introduction of organisation
    • About Director
    • Our Team
  • Franchisee
    • SME concept
    • what we offer
    • franchisee application form
  • Team of Experts
  • our Activites
  • careers
  • News & Articales
  • franchisee login
  • contact us
  • Product

start up India Stand Up India...

Picture

"आता मिळवा आपल्या गावातच रोजगार" 
​

स्टार्ट अप इंडिया STAND अप इंडिया च्या धर्तीवर एक पाउल पुढे टाकत चावडी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात “चावडी मित्र” प्रतिनिधी मानधन तत्वावर नियुक्त करणार आहे.या चावडी मित्रावर आपल्या गावातील शेतकरी ,तरुण ,महिला बचत गट , नव उद्योजकांना शेती पूरक उद्योग ,लघु उद्योग यांचे मार्गदर्शन करून त्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे. दर पंधरवड्यात एक घोंगडी बैठक आयोजित करून शेती ,उद्योग मधील नवनवीन तंत्राची माहिती गावकऱ्यांना देणे आणि गावाच्या विकासात हातभार लावणे अशी महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे..
या प्रकल्पांतर्गत किमान २१ ते ४५ या वयोगटातील व्यक्ती जॉईन होवू शकते.त्यास दर महा मानधन मिळेल. यात फक्त तरुण नाही तर प्रगतशील शेतकरी सुद्धा सहभागी होवू शकतील. या कामाने गावात रोजगार उपलब्ध झाल्यास आणि त्याच्या कामातून गावाचा सुद्धा विकास झाल्यास नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होईल.
हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सर्व प्रथम अहमदनगर येथे राबविला जाणार असून त्यात राबविताना येणाऱ्या अडचणी ,प्रश्न यांचा अभ्यास करून मग टप्याटप्यात संपूर्ण महाराष्ट्रभर याची अंमलबजावणी केली जाणार आहे

 प्रती २-३ गावासाठी १ प्रतिनिधी अशी रूपरेषा असून या अंदाजे एका जिल्ह्यात साधारण ६००-८०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे प्रकल्प यशस्वी झाल्यास महाराष्ट्रतील हजारो तरुणांना किंवा शेतकऱ्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे.सदर काम पूर्ण वेळ नसल्याने इतर वेळेत हि व्यक्ती आपली इतर कामे किंवा अगदी शेतीवरील कामे सहज करू शकतात.

Picture

चला आपला देश घडवूया !!!!!

दरमहा ५०० रुपये इतके मानधन मिळेल.आणि नक्कीच त्यास अतिरिक्त कामाचे अधिक मानधन सुद्धा मिळू शकेल.त्यामुळे चांगले काम केल्यास महिना ३-४ हजार सुद्धा मिळवता येईल
चावडी मित्र होण्यासाठी संपर्क -:९१४६०१३१०३ 
Get Started
Powered by Create your own unique website with customizable templates.