call : 7272971971
  • Home
  • About Us
    • Introduction of organisation
    • About Director
    • Our Team
  • Franchisee
    • SME concept
    • what we offer
    • franchisee application form
  • Team of Experts
  • our Activites
  • careers
  • News & Articales
  • franchisee login
  • contact us
  • Product
चावडीस जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, वाशिम, पुणे शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व यवतमाळ या जिल्हयांसाठीच फ्रान्चायजी देणे आहे.संपर्क.७७२२०५२६१०

चावडी मित्र फ्रांचायझी बाबत चे सर्वसाधारण प्रश्न 

1.       चावडी मित्र फ्रांचायझी म्हणजे नक्की काय ?

Ø  चावडीची शाखा तुमच्या तालुक्यात सुरु करणे.

2.       नक्की काम काय करावे लागेल ?

Ø  यासाठी अगोदर चावडी काय काम करते हे तुम्हाला  समजून घ्यावे लागेल त्यासाठी याच वेबसाईट वर विविध पेजेस आहेत त्याचा अभ्यास करा. तुम्हाला एकदा चावडी नक्की काय काम करते हे कळाले कि मग तुम्हाला काय काम करायचे आहे हे समजणे सोपे जाईल.

3.       यासाठी जागा किती लागेल?ऑफिस कसे लागेल ?

Ø  १००० ते १५००  sqr fit.

4.       इतर साहित्य ?

Ø  खुर्ची, टेबल,प्रिंटींग मटेरीअल, कॉम्पुटर, इंटरनेट कनेक्शन ,स्कॅनर ,प्रिंटर ,ई.

5.       पूर्ण वेळ काम करावे लागेल का ? पार्ट टाईम ?

Ø  चावडी फ्रांचायझी हा एक व्यवसाय आहे .आणि व्यवसाय म्हणजे २४ तासाची नोकरी ...आम्हाला काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात आले असलेच..

6.       चावडी मित्र  फ्रांच्यायझी कोण सुरु करू शकतो ?

Ø  किमान पदवीधर . मग कुणीही व्यक्ती याची सुरवात करू शकतो. स्वतःचा जर यापूर्वी कोणता व्यवसाय असेल तर फ्रांचायझी देताना त्याचा अग्रक्रमाने विचार केला जातो.

7.       माझे क्लाईट कोण असतील ?

Ø  शेतकरी ,महिला बचत गट ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा नव उद्योजक , व्यावसाईक हे सर्वच आपले क्लाईंट असतील कारण आपण सर्वसमावेशक सेवा एकाच छत्राखाली देत असल्याने आपली चावडी म्हणजे उद्योजकांसाठी “ONE STOP SOLUTION” असेल.

8.       मी तर कधीही कुणाला मार्गदर्शन केले नाही मग कुणी माहिती विचारली तर मी कशी सांगणार ?किंवा माझा या क्षेत्राशी कधीही संबंध आला नाही ;हे सगळे माझ्यासाठी नवीन आहे मग मला जमेल का ?

Ø  नक्कीच जमेल .कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या संत वचनाप्रमाणे २४*७ आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला ,तुमच्या स्टाफ ला आपण सुरवातीपासून प्रशिक्षण देणार आहोत आणि दर महा नव नवीन माहिती देत जाणार आहोत असे नियोजन आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका.

 

9.       मला याचे मार्केटिंग ,जाहिरात ,प्रसिद्धी करावी लागेल का ?

Ø  कोणताही व्यवसाय म्हंटले कि प्रचार आणि प्रसिद्धी हा क्रमप्राप्त मुद्दा आलाच हो कि नाही ? मग आपल्या चावडी चे नाव तुम्ही करत असलेल्या तालुक्यातील प्रत्येक घरात पोहचवण्याचे शिव धनुष्य तुम्हाला आणि आम्हाला मिळून पेलावे लागेल. यामध्ये चावडी मुख्य कार्यालयातर्फे सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यात येईलच पण स्थानिक पातळीवर तुम्हाला सुद्धा जाहिरात करणे, handwell वाटणे,गावात कायक्रम करणे,सेमिनार घेणे.सर्वसामान्य लोक, महिला बचत गट ,सुशिक्षित बेरोजगार याच्या भेटी घेणे या सारखे उप्रकम राबबावे लागतील.

10.   सुरवातीला इन्व्हेस्टमेंट किती लागेल ?

Ø  1000 ते 1500 sqr fit.ऑफिस. असा से-टप आपणास लागेल.ज्यामध्ये किमान रिसेप्शन ,प्रशिक्षण हॉल ,कन्सल्टन्सी रूम या विभागांचा समावेश होऊ शकेल

तसेच ३ लाखापर्यंत आर्थिक इन्व्हेस्टमेंट लागेल.

11.   यातून आर्थिक फायदा कसा मिळतो?

Ø  जर चावडी मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर काम झाले तर नक्कीच दर महा १  लाख पेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकेल

12.   मी करियर म्हणून चावडी मित्र कडे बघू शकतो का ?

Ø  चावडी हा मुळात व्यवसाय असल्याने हि २४ तासाची नोकरी आहे .कुणी नव उद्योजक या क्षेत्रात येत असेल तर सध्या या क्षेत्रासारख्या संधी अजून कुठेही उपलब्ध नाहीत.

13.   नक्की कामाचे स्वरूप कसे राहील ?

Ø  नेमके कामाचे स्वरूप तुम्हाला प्रशिक्षणामाध्ये दिले जाईलच पण थोडक्यात

:-        विविध प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

·         उद्योजकांच्या गरजेनुसार त्यांना उद्योगांचे संपूर्ण मार्गदर्शन करणे

·         त्यास लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे

·         प्रोजेक्ट रिपोर्ट ,इस्टीमेट ,ब्लू प्रिंट ,कोटेशन या सारख्या सुविधा पुरविणे

·         माती-पाणी परीक्षण ,आणि अन्य सुविधा देणे

·         विविध उद्योगांच्या मागणी नुसार विविध मशिनरी चा पुरवठा करणे

·        
मागणी नुसार उद्योजकांच्या प्रोडक्ट मार्केटिंग मध्ये सहकार्य करणे


या सारख्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल.

14.   मी सुरु केल्यावर माझ्या तालुक्यात दुसऱ्या कुणाला  परत फ्रानच्यायजी  देणार का ?

Ø  नक्कीच नाही जर तुम्हीच उत्तम काम करीत असाल तर इतर व्यक्तीला पुन्हा चावडी सोबत काम करण्याची संधी देण्याचा चावडी विचार करीत नाही .त्यामुळे एका तालुक्यात एक अशीच व्याख्या आहे.

15.   याचे काही टार्गेट बेस काम असेल का ? (इतर कंपनी डीलरशिप प्रमाणे )

Ø  नक्कीच असेल आणि आमच्या प्रमाणे तुमचाही टार्गेट बेस कामांवर विश्वास असेल हो ना !!! कारण जर मला किती काम करायचे आहे हेच जर माहित नसेल तर नक्की काय करायचे याचे सुद्धा भान राहत नाही.

16.   मला किती दिवसात उत्पन्न मिळणे सुरु होईल ?

Ø  खरतर पहिल्या दिवसापसुन म्हणायला हरकत नाही कारण जी सेवा तुम्ही तुमच्या भागात सुरु करीत आहात या उपक्रमाच्या शोधात अनेक लोक आहेत त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रतिसाद सुरवातीपासूनच मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

17.   मला माझ्या ऑफिस मध्ये काही कर्मचारी नियुक्त करावे लागतील ला ?

Ø  होय २ व्यक्ती.

18.   या चे प्रमोशन कसे करावे लागेल ? त्यात चावडी मला मदत करणार का ?

Ø  चावडी आपणास आपल्या परीने मदत करेलच परंतु आपणास आपल्या पातळीवर हि संकल्पना आपणास लोकांपर्यंत पोहचावी लागेल.

19.   मी सध्या नोकरी करतो. नोकरी करता करता हे काम करू शकतो का ? किंवा मी माझ्या नावाने सुरु करून माझ्या घरच्या व्यक्तीस तिथे बसवू शकतो का ?

Ø  हो, आपल्या घरातील इतर व्यक्ती हे काम करू शकते .

20.   चावडी मित्र सुरु करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ?

Ø  शक्यतो पदवीधर

21.   माझ्याकडून कागदपत्रे कोणती लागतील ?

Ø  रहिवाशी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशनकार्ड, ३ फोटो.

22.   मला चावडी मित्र सुरु करायचे आहे प्रक्रिया (PROCEDURE) कशी आहे ?

Ø  आपण आत्ता वेबसाईट बघत आहात सर्व माहिती निट वाचून झाली आणि सगळा उपक्रम समजला कि मग वेबसाईटवरच याच पेज वर एक फॉर्म दिला आहे तो आमच्याकडे भरून पाठवा आमचे फ्रांचायझी विभागाचे प्रतिनिधी तुमच्या शी संपर्क साधतील. त्याच्या सोबत सविस्तर चर्चा करा. मग एकदा आमच्या हेड ऑफिसला  भेट द्या संकल्पना पूर्ण समजावून घ्या ..येताना तुमचे सध्या चालू असलेले काम जर दुकान ,ऑफिस असेल तर त्याचे फोटोग्राफ नक्की आणा. आता संकल्पना समजली कि तुमचा अर्ज आमच्या संस्थेच्या मा. मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या कडे मंजुरी साठी जाईल. जर त्यांनी मान्यता दिली कि मग आमचे प्रतिनिधी तुमच्या कडे VISIT ला येतील. तो अहवाल मुख्य कार्यालयास जमा केला आणि परवानगी मिळाली कि आपण चावडी आणि तुमच्या मध्ये करार करून घेणार आहोत.या नंतर तुमचा LOGIN ID तयार झाला कि मग तुम्हाला आणि तुमच्या स्टाफ ला संकल्पना समजून घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमास आमंत्रित केले जाईल .हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुमच्या ऑफिस मधील सर्व आवश्यक बाबी तुम्हाला पूर्ण करून घ्याव्या लागतील. जसेकी फर्निचर ,कॉम्पुटर विविध प्रकारचे प्रिंटींग मटेरियल ,ऑफिस मधील बोर्ड्स वेगेरे. या नंतर आमचे प्रतिनिधी भेट देतील आणि सर्व कामे पूर्ण झाल्या बाबतचा अहवाल मुख्य कार्यालयास देतील तिथून मान्यता मिळाली कि...

मग योग्य मुहूर्त बघून उद्घाटन ......

23.   या बाबत अधिक माहिती साठी कुणाकडे संपर्क साधावा .

Ø –विभाग प्रमुख 7722052610

    फ्रानच्यायझी सुरु करण्याबाबत खालील फॉर्म भरावा.

Submit
Powered by Create your own unique website with customizable templates.